संपादक / शाम चटपल्लीवार
महाराष्ट्र टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष रिषभ रठ्ठे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वरोरा येथील अंबादेवी वार्डातील अंबादेवी मंदिरात आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात 49 युवकांनी रक्तदान केले तर 102 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमातून तरुणांपासून वयोवृद्ध नागरिकांनी लाभ घेतला. नागपूर येथील येस हॉस्पिटल व रेनबो ब्लड व कंपोनेंट सेंटरच्या डॉक्टर व नर्सिंग स्टाफने सहकार्य केले
कार्यक्रमात नुकतेच जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले भारतीय सैन्याचे जवान अक्षय निकुरे यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. वीर शहीद अक्षय यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित नागरिकांना मसाला भाताचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रिषभ रठ्ठे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
