संपादक / शाम चटपल्लीवार
भद्रावती : अलिकडे भद्रावती शहराची ओळख
” स्पर्धेचं शहर ” म्हणूनही उदयास येत आहे. राजकीय पक्ष तसेच विविध संघटना विविध प्रकारच्या स्पर्धा घेत असतात.
भद्रावती व परीसरात अनेक सामाजिक उपक्रम राबविनारी सामाजिक संघटना ” ईनरव्हिल क्लब ऑफ भद्रावती ” द्वारा दिनांक २.१२.२०२४ रोज सोमवार ला माँ चंडीका मंदिर परीसरात एक आगळी वेगळी/ हटके स्पर्धा आयोजित करन्यात आली होती.
स्पर्धेचं नांव ” दिवाळी फराळ स्पर्धा ” .या फराळ
स्पर्धेमधे फक्त चिवडा,लाडू, चकली व शंकरपाळे यांचाच समावेश ठेवन्यात आला होता. उत्कृष्ट व चवदार (Tasty)फराळ बनविनाऱ्या प्रथम तीन विजेत्या गृहणी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसं ठेवन्यात आली होती.
प्रथम क्रमांक पटकविनाऱ्या गृहणी ला डिनर सेट तर द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविनाऱ्या गृहणींना किचनसेट म्हणून बक्षिसं ठेवन्यात आली होती.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक डिंपल गुरनुले या डिनर सेट च्या विजेत्या ठरल्या. द्वितीय क्रमांक स्वाति चारी व तृतीय क्रमांक वैशाली लांडगे या किचनसेट विजेत्या ठरल्या.
शिंदे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका ऊज्वला वानखेडे मॅडम यांनी या स्पर्धेची परीक्षक म्हणून जवाबदारी पार पाडली.
ईनरव्हिल क्लब ऑफ भद्रावतीच्या मान.अध्यक्षा सौ.प्रेमा डि.पोटदुखे व सहकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी करन्यासाठी विषेश परिश्रम घेतले.
