सह संपादक प्रा. कु.महेश मंगल पांडुरंग देशमाने
दौंड : श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती दौंड शहर व तालुक्यात ठीक ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यासाठी भगवाद् भक्त जय श्री संताजी जगनाडे महाराज प्रतिष्ठान दौंड,महाराष्ट्र राज्य संघटनाचे पदाधिकारी शहर अध्यक्ष श्री उल्हास आत्माराम पवार , संस्थापक व तालुका अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पुणे ग्रामीण सचिव प्रा.महेश मंगल पांडुरंग देशमाने व खजिनदार श्री अजय मुरलीधर क्षीरसागर यांनी शासकीय कार्यालय तसेच घरोघरी जाऊन जयंती साजरी करण्यासाठी योगदान देतात.
आज दौंड पंचायत समिती, दौंड नगरपालिका कार्यालयात आज रविवार सुट्टी चां दिवस असूनही ८ डिसेंबर रोजी तेथील कर्मचार्यांनी श्री संताजी जगनाडे महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.दौंड तहसील कार्यालयात तेली समाज पदाधिकार्यांनी भेट दिली असता कार्यालयात कर्मचारीच उपस्थित नव्हते पण दौंड तहसीलदार अरुण शेलार यांच्याशी अध्यक्ष प्रा.देशमाने यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगून श्री संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
तसेच तालुक्यातील शाळांतही जसेकी देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे पण ह्या वर्षी जय श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिष्ठान चे ऐकच उद्दिष्ट आहे की ,संतांचे कार्य,परिचय व शिकवण नवीन पिढीला कळावे व सर्व धर्म समभाव सर्वांमध्ये रुजवावा हाच आहे असे प्रा. देशमाने सर यांनी सांगितले.